Sunday 7th June 2020
🧘🏻♂योग विज्ञान शृंखला🧘♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
(कान,नाक,घसा तज्ञ)
शवासन विज्ञान भाग २
शवासन व झोप (निद्रा) : सामान्य माणसाच्या दृष्टीने शवासन व झोप हे सारखेच आहेत. परंतु योगिकदृष्ट्या शवासनात जी मनास विश्रांती मिळते आणि त्यामुळे चयापचयाच्या क्रियेवर परिणाम होतो तो जास्त आणि चांगल्या प्रतीचा असतो.
गाढ झोपेमध्ये साधारणपणे ८ ते १० टक्के ऑक्सिजनची गरज जागेपणीपेक्षा कमी असते. तर शवासनामध्ये ती २० ते २५ टक्के जागेपणी पेक्षा कमी भासू लागते. झोपेमध्ये आपली जागृत अवस्था (Awareness सजगता) नाहीशी होते, तर शवासनामध्ये जागृत राहणे अत्यंत आवश्यक असते.
शवासनाच्या स्थितीत मेंदूमध्ये अल्फा तरंग (Waves) येतात, अशी तरंगे ध्यान व समाधी अवस्थेतही येतात.गाढ झोपेमध्ये ही अल्फा तरंगे येतीलच असे नाही.
शवासनामध्ये झोपू नये : कारण - शवासनामध्ये आपली सजगता किंवा लक्ष हे वेगवेगळ्या अवयवांवर व श्वासावर केंद्रीत केलेले असते. जर मध्येच झोप लागली तर तो अर्धबोध (Semiconscious) किंवा अबोध (Unconscious) स्थितीत जाईल जेथे त्याची सजगता राहणार नाही व तो दिलेल्या लक्ष्यापासून दूर जाईल, मन वेगळ्याच विचारात गुंतून राहील, तसेच शवासनामध्ये योग गुरु किंवा ध्वनिफितीतून दिलेल्या आज्ञा पाळल्या जाणार नाहीत. बऱ्याच वेळेस शवासनातून बाहेर आलेल्या व्यक्ति उठून बसतात, परंतु निद्रावस्थेमधे असणारी व्यक्ति झोपूनच रहाते याचा अर्थ ती व्यक्ति दिलेल्या सुचना पाळत नसते म्हणून शवासनात न झोपता सजग रहाणे आवश्यक आहे.
शवासनाची स्थिती घेतांना शयन स्थितीमध्ये दोन्ही हाताचे तळवे जमिनीकडे न ठेवता आकाशाकडे करून ठेवतात. हाताचे तळवे हे स्पर्शाच्या संवेदनेसाठी (Touch
Sensation) अति संवेदनशील असतात. तळवे जमिनीकडे केल्यास येणाऱ्या संवेदनेत वाढ झाली की चंचल मन लगेच त्याचा अर्थ काढण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे सजगता
भंग होऊ शकते. हेच स्पष्टीकरण शवासनामध्ये डोळे बंद करुन करण्यामागे आहे. डोळ्यामधून सर्वात जास्त संवेदना मेंदूकडे येतात. एडगर डेल च्या म्हणण्याप्रमाणे ८३ टक्के संवेदना (Senses) ह्या डोळ्यामधून येतात. म्हणून डोळे बंद केल्यामुळे ह्या संवेदना कमी होतात. हा एक प्रत्याहाराचाच भाग म्हणण्यास हरकत नाही.
शवासनामध्ये बाहेरुन येणारे आवाज टाळणे महत्वाचे असते. यासाठी कान बंद करुन तर ही क्रिया करता येत नाही कारण मिळणाऱ्या सूचना पाळावयाच्या असतात, त्यासाठी जागा निवडतांनाच योग्य शांत जागा निवडणे व वेळ निवडणे
आवश्यक आहे. त्यामुळे योग गुरुकडून मिळणाऱ्या सूचना स्पष्टपणे ऐकावयास येतील. तसेच किटक व मच्छर विरहीत जागा असावी, ज्यामुळे सजगतेत भंग होणार नाही.
शवासनाच्या वेळी तोंड नेहमी बंद ठेवावे. श्वास हा नाकानेच घ्यावा. योगाच्या सर्व क्रियेत तोंड बंद ठेवून नाकानेच श्वास घेतला जातो.
शवासनामध्ये जमिनीवर टाकलेले अंथरुण हे फार गादीसारखे मऊ नसावे अथवा फार कडक ही नसावे. अंथरुणाखाली एखादा खडा किंवा दगड आल्यास तो पाठीस टोचतो व हा वेदनादायी संवेदनेमुळे मन एकाग्र होण्यास बाधा येते व सजगता चांगली होणार नाही.
शवासनामागील मेंदू विज्ञान : शवासनामध्ये मेंदूतील मज्जापेशीमधे वाढ होते. नवीन मज्जापेशी तयार होतात. आसन, ध्यान आणि व्यायामाने मेंदुमध्ये काही रसायन तयार होतात, ज्यामुळे मेंदुच्या पेशीत वाढ होते. तसेच त्या रसायनाने मनाची एकाग्रता, स्मृती आणि संवेदनावरील नियंत्रण वाढते. योगासन, ध्यान आणि व्यायामाने मेंदुचा आकारही वाढतो. फक्त अमिग्डलाची वाढ होत नाही. जो एक मेंदुचाच भाग असून त्याच्यामुळे भावना उत्तेजित होतात. बऱ्याच वेळा अमिग्डलाचा आकार लहान होतो. अमिग्डला जेंव्हा फाईट किंवा फ्लाईट (Fight or Flight) ची तणावपूर्ण स्थिती असते त्यावेळी तो उत्तेजित होतो. दैनंदिन नियमित शवासनच्या सरावाने मेंदुचे नूतनीकरण होते.
चेतातंतू किंवा मज्जातंतूच्या टोकावर संवेदना वाहून नेण्यासाठी काही रसायन तयार होतात, त्यांना न्यूरोट्रान्समीटर (Neurotransmitter) म्हणतात. हे रसायन
एका मज्जापेशींकडून (Neuron) दुसऱ्या मज्ज्यापेशींकडे संदेश पाठविण्याचे कार्य करते. त्यामध्ये सिरोटोनीन (Serotonin) आणि इन्डॉरफीन (Endorphin) नावाचे
रसायन मेंदूत तयार होते. ज्यामुळे उत्साही आणि आनंदाची भावना होते. आसनामुळे मेंदुमध्ये इन्डॉरफीन (Endorphin) तयार होते.
शवासनामध्ये मेंदुमध्ये (Gamma-Aminobutyric acid, GABA) हे रसायन U अधिक प्रमाणात तयार होते जे एका मज्जापेशीतून दुसऱ्या मज्जापेशीत संदेश
पाठविण्यासाठी अटकाव करते. त्यांना Inhabitary Neurotransmitters म्हणतात. या रसायनामुळे जास्तीचे जाणारे संदेश व संवेदना कमी होतात. त्यामुळे संदेशांची
गर्दी कमी होते. त्यास चांगले वाटते. तसेच इन्डॉरफीन (Endorphin) आणि सिरोटॉनीन (Serotonin) मुळे आनंदी वाटते
Sharadyogvigyan.blogspot.com

No comments:
Post a Comment