Wednesday. 27. May 2020
🧘🏻♂योग विज्ञान शृंखला🧘♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
(कान,नाक,घसा तज्ञ)
ध्यान भाग ५
सजगता ध्यान : (साक्षी ध्यान. Open Unfocused Meditation) :
हे चवथ्या प्रकारचे व महत्वाचे ध्यान आहे ते म्हणजे साक्षी ध्यान, स्वतःच्या शरीराकडे व मनाकडे साक्षी भावाने किंवा तटस्थपणे पहायचे. अध्यात्मामध्ये हे साक्षी ध्यान सांगितले आहे. हे साक्षी ध्यान आपल्या आरोग्यासाठी उपयोगी आणि आवश्यक आहे असे आजचे मानसशास्त्र सांगते, आजचे न्यरोसायन्त असे म्हणते की, साक्षी भाव हा मानवाच्या मेंदूचे एक उपजत कार्य आहे. हा साक्षी भाव विकसिल करावा लागतो. ज्याप्रमाणे आपल्या फोनमधे अनेक कार्य (Functions) असतात पण आपणांस ते सक्रिय (ऍक्ट्विट) करावे लागतात. ते आत सक्रिय करण्यासाठी जे करावे लागते ते साक्षी ध्यान किंवा सजगता ध्यान, या ध्यानामध्ये स्वत:च्या शरीरामध्ये जे काही होते आहे ते जाणायचे, परंतु त्यास प्रतिक्रिया करायची नाही. परतु आपल्या इच्छेविरुध्द किवा मनाविरुध्द आपला भावनिक मेंदू जो मेंदूच्या लिम्बीक सिस्टीममध्ये असतो. तो आपल्या नकळत प्रतिक्रिया देत असतो. मेंदूतील लिम्बीक सिस्टीम हा भावनिक मेंदू किवा Emotional brain आहे. आपल्या भावनांचे उत्तेजन,सक्रीयता किंवा नियंत्रण या भागामधे केले जाते. तसेच मोठ्या मेंदूमध्ये सर्वात पुढचा भाग असतो त्यास prefrontal cortex म्हणतात. ज्यास वैचारिक मेंदू म्हंटले जाते.
साक्षी ध्यानामधे भावनिक मेंदू आणि prefrontal cortex ना दिलेले एक प्रशिक्षण आहे. हे ध्यान किंवा हे प्रशिक्षण यासाठी आवश्यक आहे की, भावनिक मेंदू हा सतत प्रतिक्रिया देत असतो आणि भावनिक मेंदूची प्रतिक्रिया जेंव्हा अधिक होते त्यावेळी त्याचा परिणाम म्हणून आपणास राग येतो, चिंता वाटते, वाईट वाटते.आजचे संशोधन असे सांगते की, ज्यावेळी अति राग आलेला असतो, रागाच्या भरात क्रिया करत असतो त्यावेळी मेंदूचा स्कॅन केला तर हा केवळ भावनिक मेंदूच काम करत असतो व prefrontal cortex शांत असतो. जेंव्हा भावनिक मेंदू जास्त उत्तेजित होतो त्यावेळी भावना उफाळून येतात व त्यास सैराट भावना म्हणतात. सैराट भावना म्हणजे मनात भावना आली की, लगेच कृती करणे. जी चुकीचीही असू शकते. ही सैराट कृती जर कमी करावयाची असेल तर ह्या भावनिक मेंदूची प्रतिक्रीया करण्याची सवय कमी करण्यास हवी. आणि prefrontal cortex ला अधिक सजग, अधिक सक्रिय करावयास हवे. ज्या क्रियेमधे हे केले जाते ते म्हणजे साक्षी ध्यान.
हे साक्षी ध्यान करतांना जर मेंदूचे स्कॅन केले तर लक्षात येईल की, हा भावनिक मेंदू शांत झालेला आहे आणि prefrontal cortex मध्ये सक्रियता आहे. आणि आताचे न्यूरो सायन्स असे सांगते की, एखाद्याचे हे साक्षी ध्यान रोज २० मिनीटे प्रमाणे २ महिने केले तर मेंदूत रचनात्मक बदल दिसून येतात. भावनिक मेंदूचा आकार जर काहींमधे वाढलेला असेल तर तो आकार कमी होतो आणि prefrontal cortex चा आकार वाढतो व तेथे नवीन पेशींची वाढ होते. ही एक महत्वाची बाब लक्षात आली असून कोणतेही औषध किंवा रसायन न घेता केवळ मनाला ठराविक स्थितीमधे ठेवून मेंदूत रचनात्मक बदल करता येतो. भावनिक मेंदूची सक्रियता कमी होते आणि prefrontal cortex किंवा वैचारिक मेंदूची सक्रीयता वाढते.
भावनिक मेंदूची सक्रीयता कमी करुन म्हणजेच सैराट निर्णय घेवून काम करण्यापेक्षा स्वतःला शांत ठेवून जे काही करायचे ते योग्य निर्णय घेवून करायचे असेल तर या prefrontal cortex ला जास्त सक्रीय करायला हवं.
वैचारिक मेंदूला (prefrontal cortex) ला सक्रीय करण्यासाठी ७ ते १० मिनीटे शरीराची हालचाल होऊ द्यायची नाही आणि असे जे आपण ठरवतो ते prefrontai cortex मुळे ठरवतो. परंतु न कळत जी हालचाल होते, जसे एखाद्या ठिकाणी खाजवणे ही हालचाल लिम्बिक सिस्टीम मधील ऍमिग्डला (भावनिक मेंदू) हा prefrontal cortex ला न समजताच ती हालचाल करुन घेते. म्हणून prefrontal cortex ला सक्रीय होण्यासाठी जागृत रहाणे आवश्यक आहे. आपण कुठलीही हालचाल नकळतपणे करणार नाही याकडे लक्ष द्यायचे. म्हणजेच खाज वगैरे आली तर ती फक्त जाणायची, त्यास प्रतिक्रिया द्यायची नाही. ती खाज कमी होते की जास्त होते ते फक्त उत्सुकतेने पहायचे. मग ते खाज असेल, दुखत असेल, जळजळ असेल, धडधड असेल, टोचत असेल, काहीही होत असेल. शरीरात जे जे काही होत असेल ते ते जाणायचे आणि त्याचा स्विकार करायचा, तेही साक्षी भावाने. कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही. अशा ध्यानामधे आपण जे काही जाणतो आणि त्याचा स्विकार करतो म्हणजे ज्यावेळी जाणतो त्यावेळी prefrontal cortex ला काम देत असतो आणि स्विकार करतो. त्यावेळी एमीग्डाला (भावनिक मेंदू) चे काम करत असतो. भावनिक मेंदूला शब्दानी सांगणे शक्य नाही. कारण तो सतत संवेदनाच्याच प्रती जागरुक असतो. तो भावनिक मेंदू सतत जागृत असतो. शरीरात काय होते आहे त्याबद्दल, म्हणून आपण राग कमी करायला हवा, माझे ब्लड प्रेशर कमी करायला हवे असे म्हणून उपयोग नाही. कारण ते भावनिक मेंदूपर्यंत पोहोचतच नाही. म्हणून ह्या मेंदूपर्यंत पोहोचायचे असेल तर साक्षी ध्यान (सजगता ध्यान) करणे आवश्यक आहे.)
सजगता ध्यानामध्ये श्वासाची जाणीव वाढविण्याचा अभ्यास करायचा. श्वास म्हणजे नाकातून हवा आत जाते आणि बाहेर पडते. त्यावेळी तिचा स्पर्श नाकाच्या प्रवेशव्दाराशी होतच असतो, आपण बहिर्मुखी असल्याने नेहमी तो स्पर्श जाणवत नाही. त्यासाठी शांत बसायचे आणि आपले मन वरचा ओठ आणि नाकाचे प्रवेशव्दार येथे एकाग्र करुन तो स्पर्श जाणायचा. श्वास रोखायचा नाही किंवा मुद्दाम जोरात घ्यायचा नाही. नैसर्गिक श्वास कोणत्या नाकपुडीतून आत जातो, कोणत्या बाजूने बाहेर पडतो हे कोणतीही प्रतिक्रिया न देता जाणत राहायचे.
वैद्यकीय क्षेत्रातील मुख्य प्रवाहाने ध्यान चिकित्सेला मान्यता दिली आहे.अमेरिकन सरकारने ह्या ध्यानाचा उपयोग आपल्या सैनिकासाठी सुरु केला आहे.सैनिकानी दिवसभरात फक्त तेरा मिनिटे सजगता ध्यान केले तर त्यांची एकाग्र होण्याची क्षमता वाढते असे डॉ झा यानी दाखवून दिले आहे.सजगता ध्यान हे एक प्रकारे मानसोपचारच आहे.
Sharad yog vigyan.blogspot.com

Very nice informative about open unfocused meditation
ReplyDeleteThis is called Kayostarga in Jainism . It is one of the position adated during Samaik n Pratikraman.you can corelate it.
ReplyDelete