योग विज्ञान शृंखला* 🧘♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
(कान,नाक,घसा तज्ञ)
प्राणायाम भाग १
सामान्य माणसामध्ये प्राणायाम म्हणजे सर्वसाधारणपणे स्वासोच्छवास नियंत्रण हेच त्यांचे स्थूल रूप लोकांच्या डोळ्यापुढे येते. परंतु प्राणायामाची संकल्पना सूक्ष्मदृष्टया आणि खूप खोलात जाऊन पाहिल्यास त्यापेक्षा खूपच व्यापक आणि विस्तारित आहे.
प्राणायाम म्हणजे प्राणाचा आयाम . यातील प्राण आणि आयाम या दोन्ही शब्दाचे अनेक अर्थ संभवतात. प्राणायामाचे व्यवहारातले प्रयोगात्मक स्वरूप डोळ्यापुढे आणल्यास प्राण म्हणजे स्वसोच्छवासाची क्रिया व आयाम म्हणजे या क्रियेचे एका विशिष्ठ पद्धतीने व जाणीवपूर्वक केलेले नियंत्रण असाच अर्थ होतो.
प्राण म्हणजे शरीरांतर्गत सर्व जैविक क्रियांचे अधिष्ठान असणारी शक्ती,जी उत्तरोत्तर सूक्ष्म व तरल होत जाणाऱ्या प्राण शक्तीचा सर्व कार्य विस्तार जाणिवेच्या कक्षात आणणे असाही होतो.
प्राणायामाचा अभ्यास हा अध्यात्मिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त व आवश्यक आहे शरीराच्या आतमध्ये ज्याला देहकाश किंवा घटाकांश असेही म्हंटले जाते. त्यात नेहमी काहीं ना काही जैविक क्रिया चालू असतात. त्यातील सूक्ष्म रूपातील क्रिया बरेचदा आपल्या जाणिवेच्या कक्षेत येत असतात. परंतु बहुतांशी इतर बऱ्याच क्रिया या सूक्ष्म स्तरावर घडत असून क्वचितच आपल्याला त्याची जाणीव होते. त्यांना जाणिवेच्या कक्षेत आणून त्याचे नियमन करावयाचे असल्यास आपली अंतर्गत संवेदनशीलता ही अतिशय सूक्ष्म व सर्वग्राही होणे आवश्यक आहे. त्याद्वारेच आपल्या जाणिवेचे क्षेत्र व स्वरूप समृद्ध होऊ शकते. त्यासाठी ज्या अनेक पद्धती प्रचलनात आल्या त्यात प्राणायामाला अग्रस्थान आहे.
प्राणायामाच्या स्थूल अंगाचा जस-जसा अभ्यास वाढून त्यात अधिकाधिक कौशल्य प्राप्त होत जाईल तस-तसे साधकाने आपले लक्ष प्राणायामाच्या स्थूल अंगाकडून सूक्ष्म अंगाकडे वळवावे अशी अपेक्षा असते. त्यातूनच या प्राणशक्तीचे सूक्ष्म स्तरावर कसे नियंत्रण करावे याचा अभ्यास
तो करू लागतो.
सुईमधून दोरा ओवतांना आपला श्वास किंचित काळ थांबतो कारण त्यामुळे मनाची एकाग्रता होऊन ते कार्य साधते. तसेच जेंव्हा लक्षपूर्वक किंवा एकाग्रतेने काम करीत असतो त्यावेळी इतर विचारही थांबलेले असतात.
मनाचा आणि श्वसनाचा इतका निकटचा सबंध आहे की, एकाची स्थिती बदलली की, दुसऱ्याचे स्वरूप अपरिहार्य पणे बदलते. मनात येणारे विचार ,भावना,वासना याने श्वसनाची संख्या, गती व स्वरूप बदलते.
ज्यावेळी राग,द्वेषादी भावनांचा अतिरेक होतो त्यावेळीही आपल्या श्वसनाची गती,खोली, व श्वास घेणे आणि सोडण्याचा प्रकार यात फरक झालेला असतो. कारण भावनांचा आणि इतर मानसिक अवस्थांचा परिणाम मज्जासंस्थेवर होतो व त्याद्वारे आपल्या श्वासनात बदल होतात. म्हणजेच जर मुद्दाम स्वेच्छेने आपल्या श्वसनात योग्य तो बदल केला व त्याचा रोज सराव केला तर आपल्या भावनावर, मनावर नियंत्रण आणू शकतो. प्राणायामाने मनावर ताबा मिळविणे, मानसिक स्थिरता, शांतता मिळविणे हाच मुख्य उद्देश आहे. त्यामुळे ध्यान करणेही सोपे जाते.
sharadyogvigyan.blogspot.com

Respected sir,
ReplyDeleteThis is really a very nicely written article.This elaborates details of all aspects of yogas .No doubt this series of article s will be beneficial to many people .
Thank you for your encouraging response.
Delete