Sunday 24 May 2020
🧘🏻♂योग विज्ञान शृंखला🧘♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
(कान,नाक,घसा )
ध्यान भाग २
एकाग्रता ध्यान (Focused Meditation) :
हे एकाग्रता ध्यान वेगवेगळ्या प्रकारे करता येते जसे त्राटक (बिदू, ज्योती). प्रजापिता ब्रह्मकुमारी मध्ये लाल दिव्यावर मन एकाग्र केले जाते. आवाजावरही मन एकाग्र करू शकतो. जसे भ्रामरी प्राणायमामध्ये नादावर मन एकाग्र केले जाते. जो एक नादानुसंधानाचाच भाग आहे. श्वासावरही लक्ष केंद्रीत करता येते. नाम शब्द घेऊनही हे ध्यान करता येते. मंत्र ध्यान ज्यामध्ये एखादा मंत्र घेऊन मन एकाग्र करता येते. ओमकारच्या प्रतिमेवर ध्यान देऊनहीं ध्यान एकाग्र करता येते. ज्यावेळी आपण ज्योतीकडे पहात असू किवा नामस्मरण करत असू अथवा श्वासाची हालचाल पहात असू , थोड्याच वेळात मन भरकटत जाते आणि मनात विचार यायला लागतात की आपण जे काही आलंबन निवडलेले आहे त्यापासून आपले लक्ष दुसरीकडे गेले आहे. हे स्वाभाविक आहे, नैसर्गिक आहे. ज्यावेळी ध्यानात येते की, आपले लक्ष दुसरीकडे गेले आहे त्यावेळी आपले लक्ष ठरवलेल्या आलंबनावर आणणे म्हणजे एकाग्रता ध्यान, ज्यावेळी आपण परत लक्ष आलंबनावर आणतो त्यावेळी मेंदूमध्ये डार्सोलेटरल प्रि फ्रंटल कॉर्टेक्स (Darsolateral Prefrontal Cortex) नावाचा एक भाग आहे ज्याला अटेंशन सेंटर (Attention Center) असे म्हटले जाते. तो सक्रिय होतो ज्यावेळी मला लक्षात येते की, मी श्वासावर लक्ष देतो आहे आणि माझे मन विचारात गेले नाही आणी स्थिर आहे. माझा श्वास मला समजत असतो त्यावेळी तो Darsolateral prefrontal cortex उत्तेजित झालेला असतो किंवा त्याची सक्रियता वाढलेली असते आणि परत मी श्वासावर लक्ष आणतो.परत लक्ष दुसरीकडे जाते,परत आपण लक्ष श्वासावर आणतो,असे जेंव्हा परत परत घडते त्यावेळी Darsolateral prefrontal cortex मध्ये नवीन पेशींची निर्मिती होते असे आजचे न्यूरोसायन्स सांगते, आणि त्याचा परिणाम म्हणून आपण जास्तीतजास्त एकाग्र राहू लागतो.
ध्यानाचा अजून एक फायदा आजच्या मेंदू विज्ञान ला समजलेला आहे आणि तो म्हणजे जेंव्हा आपण श्वासावर लक्ष केंद्रित करतो त्यावेळी मेंदूतल्या विचार करणाऱ्या भागाला विश्रांती मिळते,त्याला शास्त्रज्ञानी नाव दिले आहे Default mode net work . आपण शांत बसलेलो असतो त्यावेळीही आपला मेंदू शांत नसतो.त्याच्या मध्ये सतत विचार येत असतात,भूतकाळातले,भविष्यातल्या वेगवेगळ्या घटना ,आठवणी आणणे हे सतत मेंदूत चालू असते.अश्या विचाराच्या वेळी Default mode net work ला विश्रांतीच मिळत नाही.
मेंदूच्या संशोधनामध्ये डोक्यावर अनेक इलेक्ट्रोड्स लावून मेंदुचा कोणता भाग सक्रिय नाही हे समजत. त्याच्यावरुन असे लक्षात आले की, जेंव्हा ध्यानामध्ये आपण श्वासावर लक्ष दिले तेवढा वेळ आपन मेंदूतील विचार करणाऱ्या भागाला विश्रांति देतो. ही विश्रांति मेंदुला देणे फार आवश्यक असते.जेवढया श्वासासाठी आपण सजग होऊन मेंदूला विश्रांती देतो, त्या प्रत्येक श्वासाला गुगल कंपनीमध्ये Good Breath
असे म्हटले जाते. साधारण ५५ हजार नोकरदारांना गुगलमध्ये हे ध्यान शिकवले जाते. आणि ते असे सांगतात की, कमीतकमी एक Good Breatn हा एक तासामध्ये
घ्यावा. कारण सजग श्वासाचा परिणाम हा पुढील एक तासापर्यंत राहतो आणि मेंदूला विश्रांती मिळाल्यामुळे पुढेही तो चांगल्याप्रकारे काम करू शकतो. ध्यान ही ठराविक
वेळीच करण्याची गोष्ट नाही तर, ध्यान ही सतत अणि केव्हाही करण्याची गोष्ट आहे. म्हणून दर १ किंवा २ तासांनी हे एकाग्रता ध्यान १ ते २ मिनिटांसाठी करणे उपयोगी ठरते
sharadyogvigyan.blogspot.com

No comments:
Post a Comment