Tuesday 19th May 2020
🧘🏻♂योग विज्ञान शृंखला🧘♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
(कान,नाक,घसा तज्ञ)
प्राणायाम भाग ११
प्राणायामाने शरीर आणि मनाचे शुद्धीकरण होते. जेंव्हा नवीन साधक रोज भस्त्रिका प्राणायाम करतो, त्यावेळी सुरुवातीस मनामध्ये विचित्र कल्पना,चमत्कारिक विचार व स्वप्न दिसू लागतात.साधक कदाचित भयभीत ही होतो.अशा वेळी मनाचे शंखप्रक्षालन म्हणजेच चित्त शुद्धी होते आहे असे समजावे.
प्राणशक्ती उत्तेजित होण्यासाठी फक्त खोल श्वास (Deep breathing) घेणेच महत्वाचे नाही. खोलवर श्वासाने श्वसन यंत्रणा व रक्ताभिसरण यावर चांगला परिणाम होतो,परंतु मेंदूवर परिणाम होत नाही.वैज्ञानिक प्रयोगातून सिद्ध झाले आहे की,एकाग्रतेने व सजगतेने प्राणायाम केल्यास मेंदूवर चांगला परिणाम होतो,व मेंदू लहरी (Brain waves) मध्ये सकारात्मक बदल दिसून येतात.
मेंदूमधील विद्युतलहरी जसे बीटा,अल्फा,थिटा व डेल्टा ह्या लहरी मनाच्या वेगवेगळ्या स्थितीशी जसे जागृत, स्वप्न, सुषुप्ती(निद्रा) व तुरीया अवस्थांशी कर्मश: सम्बधित असतात.
श्वासोच्छवास हा थेट मेंदूशी जोडलेला असतो.तसेच भावनिक मेंदू (Hypothalamus) शी जोडलेला असतो, म्हणून जेंव्हा जेंव्हा भावना बदलतात तेंव्हा श्वासही बदलतो. जेंव्हा श्वास तालबद्ध किंवा मंद, संयमित असतो, त्यावेळी भावना नियंत्रित असतात.
प्राणायामाने हळू हळू कुंभकाचा अवधी वाढवला जातो.सरावाने जेंव्हा कुंभकाचा अवधी वाढतो, त्यावेळी मेंदूकडे जाणाऱ्या संवेदनांची संख्या कमी होते, त्यामुळे मेंदूला प्रतिसाद कमी द्यावा लागतो. आणि मेंदूस आराम मिळतो,त्यास शांत वाटते,तो सक्षम बनतो.
स्वायत्त मज्जासंस्थेवर प्राणायामाच्या होणाऱ्या परिणामावरून त्याचे तीन प्रकार पडतात.
१. जे प्राणायाम उष्णता निर्माण करतात जसे चैतन्यपूर्ण प्राणायाम (Vitalizing) जसे भस्त्रिका व कपालभाती यांचा परिणाम अनुकंपा मज्जासंस्थेवर पडून ती सक्रिय बनते.
२. ज्या प्राणायामापासून उष्णता कमी होते,शांत वाटते,व तणावरहित वाटते जसे शांतीपूर्ण प्राणायाम (Tranquillizing) जसे भ्रामरी, उज्जयी, शितली, शित्कारी प्राणायाम याच्यामुळे परानुकम्पा मज्जासंस्था सक्रिय होते.
३.संतुलनात्मक प्राणायाम (Balancing) जसे नाडीशोधन याचा प्रभाव अनुकंपा व परानुकम्पा मज्जासंस्थेवर सारख्याच प्रमाणात पडतो.
संशोधनाने सिद्ध झाले आहे की,नाकामधील त्वचे मध्ये (Mucous membrain) केंद्रीय मज्जासंस्थेपेक्षा वीस पटीने स्वायत्तमज्जा तंतु जास्त प्रमाणात असतात. श्वास घेतल्यानंतर आत जाणाऱ्या हवेच्या प्रवाहाबरोबर दोन्ही नाकपुडयामधील त्वचेच्याखाली असलेल्या विशिष्ट स्वायत्त मज्जातंतुमुळे श्वसनसंस्था,रक्ताभिसरण व पचनसंस्था प्रभावित होतात.
प्राणायाम शक्यतो पहाटे ब्रह्ममुहूर्तावर सकाळी ४ ते ६ मध्ये करावा कारण त्यावेळी कमी ध्वनी प्रदूषण व स्वच्छ हवा असते. यावेळी हवेत जास्तीतजास्त ऋण विद्युत भारित आयन (Negative ions) असतात त्यामुळे प्राणायामानंतर जास्त ऊर्जा प्राप्त होते व प्रसन्न वाटते.
प्राणायाम व योग करताना सूती कपड्याचा वापर करावा.सिंथेटिक कपडे धन भारित आयन (Positive ions) आकर्षित करतात व ऋण भारित आयन
(Negative ions) विकर्षित करतात.त्यामुळे प्राणायामात निर्माण होणारी ऊर्जा कमी होते.
महर्षि पतंजलि यांनी कुम्भक म्हणजेच प्राणायाम असे म्हणले आहे.कुम्भकामध्ये श्वास रोकुन धरल्यामुळे मेंदुमधील कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण वाढते,त्यामुळे मज्जापेशी मज्जाकेन्द्रकांना श्वास घेण्यासाठी उत्तेजित करतात. एका न्यूरॉन मधून दुसऱ्या न्यूरॉन मध्ये प्रेरणा (Nerve impulse) जाण्यासाठी त्याच्या सिनॅप्स (Synapse) मधून जावे लागते त्यासाठी न्यूरोट्रान्समीटर ची गरज असते.जितक्या जास्तवेळ श्वास रोकून धरला जाईल तितक्या जास्त प्रमाणात न्यूरॉट्रान्समीटर तयार होऊन प्रेरणा वाहून नेली जाते.त्यामुळे मेंदूमध्ये नवीन न्यूरॉनल मार्ग तयार होतात .तसेच मेंदू केंद्र उत्तेजीत होतात.याचाच भाग म्हणून प्राणायामामध्ये किंवा कुंभकाच्या अभ्यासात चिदाकाशात (डोळे बंद केल्यानंतर दिसणारा पडदा) प्रकाश व वेगवेगळे रंग दिसू लागतात.
sharadyogvigyan.blogspot.com

Very inspiring and helpful
ReplyDeleteNice scientific approach about pranayam
ReplyDeleteStudied articles on pranayam
ReplyDelete