Monday 18th May 2020
🧘🏻♂योग विज्ञान शृंखला🧘♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
(कान,नाक,घसा तज्ञ)
प्राणायाम भाग १०
सध्याच्या काळात प्राणायामाचे त्याच्या परिणामावरून मुख्य तीन प्रकारामध्ये वर्गीकरण केले आहे.
१. संतुलनात्मक (Balancing practices)
२. चैतन्यपूर्ण ( Vitalizing practices)
३.शांतीपूर्ण (Tranquillizing practices)
नवीन साधकांनी नाडीशोधन प्राणयामापासून सुरुवात करावी.ज्यामुळे इडा आणि पिंगळा यांच्या श्वास प्रवाहाचे संतुलन होईल.चैतन्य निर्माण करणारे भस्त्रिका आणि कपालभाती प्राणायामाने उष्णता निर्माण होते,असे प्राणायाम मध्यम आणि प्रगतिशील साधकांनी करावेत.शांती प्रस्थापित करणारे प्राणायाम शरीर आणि मन शांत करते.तसेच प्राणिक प्रवाह वाढतो, आणि सूक्ष्म स्पंदन व नाद याबद्धलची जागरूकता वाढवितो. भ्रामरी ,उज्जायी, शीतली, शित्कारी प्राणायाम हे शांती प्रस्थापित करणारे प्राणायाम असून यांचा प्रभाव परानुकंपा (Parasympathetic ) मज्जासंस्था व केंद्रीय मज्जासंस्था यावर पडतो.अश्या प्राणायामाचा सराव संतुलनात्मक ( नाडीशोधन) प्राणायानानंतर करावा.
ज्यांना उच्चरक्तचाप आहे अशानी जलद श्वसन करू नये.परंतु ज्यांना उदासीनता, सुस्ती,आळस आणि ज्यांचा रक्तदाब कमी आहे अशानी जलद श्वसन (चैतन्यपूर्ण) करावे.ज्यांना स्वायत्त मज्जासंस्थेवर नियंत्रण प्राप्त करावयाचे आहे त्यांनी जास्तीतजास्त कुंभकाचा (Retention of breath) सराव करावा.
प्राणायामापासून जी ऊर्जा आपल्या शरीरास मिळते ती आपण अश्या प्रकारे समजू शकतो.प्राणायामामुळे शरीरात स्थिर विद्युत शक्ती (Static electrisity) तयार होते. ज्यामुळे श्वासावाटे हवेतून शरीरात गेलेले धनभारीत आयन ( Positive ions) रिचार्ज होऊन त्यांचे रूपांतर ऋण आयन (Negative ions) मध्ये होते.ज्याप्रमाणे पाऊस पडून गेल्यानंतर आपणास उत्साही आणि चैतन्यपूर्ण वाटते कारण पावसामुळे वातावरणातील पॉझिटिव्ह आयन्स रिचार्ज होऊन निगेटिव्ह आयन्स मध्ये बदलतात. शुद्ध हवेच्या ठिकाणी निगेटिव्ह आयन चे प्रमाण जास्त असते.त्यामुळे आपणास प्रसन्न वाटते.अस्वच्छ कोंदट किंवा दमट हवेमध्ये पोझीटीव्ह आयनचे प्रमाण जास्त असते.त्यामुळे आपणास सुस्त,आळस व थकल्यासारखे वाटते. प्राणायामामुळे शरीरात स्थिर विद्युत तयार होऊन कांही प्रमाणात पॉझिटिव्ह आयनचे रूपांतर निगेटिव्ह आयनमध्ये झाल्यामुळे आपणास उत्साही व उर्जावान वाटते.
योगामध्ये शितलीकरण किंवा तणावरहित (Relaxation) होणे म्हणजे फक्त शरीर तणावरहित नसून चेतन ( जागृत ) मन व अवचेतन (अर्धजागृत) मन ही शांत, शिथिल व तणावरहित होणे आवश्यक असते.बऱ्याच वेळा शरीर शांत असते परंतु मन अशांत असते. तसेच मन शांत असले तरी अवचेतन मन शांत असेलच असे नाही.जसे झोपेची गोळी घेतली तर शरीर आणि जागृत मन शांत होईल परंतु खोलवर अवचेतंन मनातील काळजी तशीच राहते. प्राणायामामुळे प्रभावीपणे सर्वच स्तरावर शांतता व शिथिलता प्राप्त होऊ शकते.
प्राणायामामध्ये दिर्घश्वसनाचा अभ्यास केला जातो. ज्यामध्ये पूरक (श्वास घेणे) आणि रेचकाचे (श्वास सोडणे) प्रमाण हे १:२ असणे अपेक्षित असते, जे हृदयासाठी फारच उपयुक्त आहे.श्वास घेताना हृदयाची गती वाढते तर श्वास सोडताना हृदयाची गती कमी होते.दीर्घ श्वसनामध्ये रेचक जास्तीतजास्त लांबविला जातो.त्यामुळे हृदयाची गती जास्त काळ कमी रहाते.त्यामुळे हृदयातील स्नायूंना विश्रांती मिळते.तसेच मेंदू व शरीरातील इतर अवयवांना रक्त पुरवठा योग्य प्रमाणात होतो.
पूरक आणि रेचकाचे हेच प्रमाण १:४ केले तर हृदयास विश्रांती मिळण्याऐवजी जास्त काम करावे लागते.कारण मेंदूला मिळणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे मेंदू हृदयाला जास्त काम करण्यास भाग पाडते.
sharadyogvigyan.blogspot.com

No comments:
Post a Comment