*योग विज्ञान शृंखला* 🧘♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
(कान,नाक,घसा तज्ञ)
योगासन भाग ६ शवासनामध्ये GABA (Gamma amino butiric acid) हे रसायन मेंदूमध्ये तयार होते जे रसायन एका मज्जापेशीतून दुसऱ्या मज्जापेशीत संदेश पाठविण्यास अटकाव करते. त्यांना inhibitory Neurotransmitter म्हणतात. या रसायनामुळे मेंदूकडे जास्तीचे संदेश व संवेदना कमी होतात. त्यामुळे संदेशाची गर्दी कमी होते व मेंदूस शांत आणि तणावरहित वाटते.
बैठक स्थितीत शरीरातील 4 कॅलरी/ मिनिट खर्च होतात. शवासनात 2 कॅल/ मिनिट खर्च होतात. बी. एम. आर (Basic Metabolism Rate) ही कमी होतो. त्यामुळे ऊर्जा कमी खर्च होते व शांत वाटते. थकवा कमी होतो.
आपल्या शरीरात रोगप्रतिकार शक्ती (Immune System) कार्यरत असते. त्यामध्ये शरीरातील प्रत्येक पेशी हा बाहेरील विषाणूशी लढत असतो. या क्रियेमध्ये शरीरातील अनेक घटक सहभाग घेत असतात. आपल्या शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी लसीका ग्रंथी ( Lymph nodes) असतात. जेथे आपल्या संरक्षक पेशी (White blood cells) व विषाणू यांच्यामध्ये लढाई होते. सम्पूर्ण शरीरभर लसीका रस (Lymphtic Fluid) आपल्या शरीरामधून वहात असतो. जो विषाणूंचे अनावश्यक मृतपेशी वाहून नेण्याचे काम करीत असतो.
रक्ताभिसरणासाठी शरीरात ह्रदयाद्वारे रक्त पूर्ण शरीरात पंप केले जाते. परंतु लसीका रस वाहून नेण्यासाठी अशी कोणतीही योजना किंवा पंप शरीरात नसतो. त्यामुळे लसिकाचे पूर्ण शरीरभर रसाभिसरण होण्यासाठी स्नायूंच्या आकुंचनाच्या आणि प्रसरणाची आवश्यकता असते. याचाच अर्थ शरीरातील वेगवेगळ्या भागाची हालचाल होणे आवश्यक असते. म्हणून स्नायूंची हालचालच लसीकभिसरणासाठी पंप आहे. म्हणून शरीरातील वेगवेगळ्या भागांचा व्यायाम किंवा हालचाल जी आपण योगासनामध्ये करतो ती लसीका रसाच्या अभिसरणासाठी आवश्यक आहे. स्वासपटलाची हालचाल जी आपण कपालभाती , अग्निसारमध्ये करतो त्यामुळे लसाभिसरण जलद होते. ज्यामुळे पोटातील लसीकाग्रंथीवर प्रभाव पडतो. तितली आसनामुळे जांघेतील लसीकाग्रंथीवर प्रभाव पडतो. पोटरीच्या स्नायूंच्या (Calf muscles) हालचालीमुळे पायाकडील लसीका रस वरच्या दिशेने जातो. पोटरीच्या स्नायूंना दुसरे हृदय अशीही उपमा दिली जाते. कारण त्याच्या आकुंचनाने पायाकडील लसीका रस गुरुत्वाकर्षणानाच्या विरुद्ध वरच्या दिशेने जातो. म्हणून योगासनातील चलीत आसनामुळे व वेगवेगळ्या हालचालीमुळे हा लसीका रस चलनात रहातो. हा लसीका रस अभिसरणात राहिल्यामुळे विषाणूशी रक्तातील संरक्षक पेशी (WBC )चा सामना होतो. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते.

sharadyogvigyan.blogspot.com
No comments:
Post a Comment