6th May 2020
🧘🏻♂योग विज्ञान शृंखला🧘♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
(कान,नाक,घसा तज्ञ)
प्राणायाम भाग ३
नेहमीच्या स्वाभाविक श्वसनात आपण ५०० मि.ली. हवा घेतो तर पूरक मध्ये १ ते १.५ लिटर हवा आपण घेतो. फक्त एका पूरक चा विचार केल्यास फुफ्फुसांमध्ये एका सामान्य श्वासाच्या मानाने निश्चीतच जास्त प्राणवायू उपलब्ध आहे. वेळही जास्त लागल्याने फुफ्फुसाचे वायूकोष व रक्तवाहिन्या यामधील प्राणवायू व कर्बाम्लवायू यांची अदलाबदल जास्त परिणामकारक रीतीने होते. पण प्राणायामात एका मिनिटात असे पूरक २ किंवा ३ च होतात. त्यामुळे ५ ते १० मिनिटात होणाऱ्या प्राणायामाच्या अभ्यासात मिळणारे प्राणवायूचे प्रमाण ५ ते १० मिनिटात होणाऱ्या सामान्य श्वासनातील प्राणवायूच्या प्रमाणापेक्षा कमीच असते. परंतु प्राणायामात जास्तीत जास्त वायूकोषाचा उपयोग व त्याचे जास्तीत जास्त ताणले जाणे यामुळे दिवसभर आपली फुफ्फुसांची कार्य क्षमता चांगली राहते.
कुंभकात आपण जवळ जवळ १० ते २० सेकंद श्वास रोखुन ठेवतो तोपर्यंत हृदयातून रक्त येणे व जाणे १५ ते २५ वेळा होते. वेळही भरपूर व रक्ताचे प्रमाण हवे त्यापेक्षा जास्त झाल्याने प्राणवायू रक्तात येणे व कर्बाम्लवायू रक्तातून वायूकोषात येणे हे वाढीव क्षमतेने होते. काही क्षणातच एका मर्यादेनंतर म्हणजे जेंव्हा वायूकोष व रक्तवाहिन्यातील वायूचे प्रमाण ,दाब समान होतात व वायूची अदलाबदल होऊ शकत नाही. अशावेळी रक्तातील कर्बाम्लवायूमुळे लंबमज्जा ( Medula Oblongata) मधील रसायन ग्राहक (Chemo receptors) अधिकाधिक उत्तेजित होतात व प्रतिक्षिप्त क्रियेने केंद्रामार्फत प्रश्वास घडवून आणू पाहतात. परंतु आपल्या जोरदार इच्छेपुढे त्याचे कांही चालत नाही. अर्थात रसायन ग्राहकांना जास्तीत जास्त कर्बाम्लवायुचे प्रमाण सहन करण्याची सवय हळू हळू लावावी लागते. म्हणूनच कुंभकाचा वेळ सरावाने हळू हळू वाढवायचा असतो.
प्राणायाम करण्यासाठी शांत चित्ताने, शरीर व मन शिथिल ठेवून रिकामे पोटी बसावे. अशावेळी एकूणच प्राणवायूची गरज कमी असते आणि जास्तीत जास्त प्राणवायू घेणे- मिळविणे हे उद्दीष्ट नाही. ध्यान व पुढील उच्च साधनेसाठीमज्जासंस्थेस तयार करणे हे आहे.प्राणायामाचा सराव लक्षपूर्वक जाणीवपूर्वक व्हावा म्हणून पूरक,कुंभक,बंध, विशिष्ठ स्वरचे (उदा.भ्रामरी, उज्जायी इ.) प्रयोजन आहे.ह्या सर्व क्रिये मूळे एकाग्रता वाढते.यांत्रिकतेने प्राणायाम कधीही करू नये.त्यामुळे म्हणावा तसा परिणाम दिसून येत नाही.
sharadyogvigyan.blogspot.com

महत्वपूर्ण माहिती
ReplyDelete