Thursday 21 May 2020
🧘🏻♂योग विज्ञान शृंखला🧘♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
(कान,नाक,घसा तज्ञ)
ध्यान विज्ञान. भाग १
ध्यानाचा संबंध इश्वर प्राप्तीसाठी, साक्षात्कारासाठी किंवा आत्मकल्याणासाठी करायची साधना असा लावला जातो. म्हणून त्याचा संदर्भ धर्म, अध्यात्म, उपासना याच्याशी जोडला जातो. भौतिकदृष्टया जर विचार केला तर ध्यानाचा परिणाम मानवाच्या शरीर, मन आणि मेंदूवर होतोच शिवाय संपूर्ण जीवनावर सकारात्मक परिणाम दिसून येतो. मागील अनेक वर्षापासून जगातील विविध देशात ध्यानाचा परिणाम शरीर, मन आणि मेंदूवर काय होतो याचे संशोधन होत आहे. एकविसाव्या शतकात ध्यानाचा मेंदूवर होणाऱ्या परिणामांचे संशोधनात बरीच प्रगति होत आहे. ध्यानाचा परिणाम मानवाच्या शरिराच्या पेशीपर्यंत होतो. ध्यानामुळे मेंदूला काही काळ विश्रांती मिळते त्यामुळे माणसाची आकलन शक्ति, स्मरणशक्ती आणि निर्णय क्षमता वाढते, भावनिक स्थिरता प्राप्त होते.
ध्यानाचा वैज्ञानिक दृष्टीतून शरीरावर, मनावर, मेंदूवर व पेशीवर काय परिणाम होतो हे सिद्ध होत आहे आणि याचे सकारात्मक परिणाम संशोधनातून दिसून येत आहेत. ह्या ध्यानाचा सकारात्मक परिणाम व त्याचा उपयोग सामान्य लोकांना व्हावा, एवढेच नाही तर जो ईश्वराला मानत नाही अशा नास्तिकापर्यतही पोहोचायला हवे. कारण ईश्वर मानणे न मानणे हे मेंदूतून ठरत असते आणि हे ध्यान मेंदूसाठीच काम करत असते.
१) ध्यान सुरू केल्यानंतर शरीराकडून वापरला जाणारा ऑक्सिजन १० ते २० प्रतिशत कमी होतो. जागृतावस्थेपेक्षा झोपेमध्ये हे प्रमाण ६ ते ८ प्रतिशत कमी असते. शरीराची चयापचय क्रिया मंद होते. ध्यानामध्ये हा फरक पहिल्या तीन मिनीटातच दिसून येतो.
२) मेंदूच्या आलेखामधे (E.E.G) अल्फा लहरींचे प्रमाण वाढते. अल्फा लहरी मेंदू शांतता व रिलॅक्स स्थितीत असतांनाच दिसतात.
3)रक्तामधील लॅक्टेट (Blood Lactate) नावाचे रसायन कमी होते. रस्तामध्ये लॅक्टेटचे प्रमाण जास्त असणारी माणसे चिंतेला जास्त बळी पडतात, ध्यान सुरु केल्यानंतर ह्याचे प्रमाण दहा मिनीटात कमी होते.
ध्यान हे घरोघरी पोहोचणे आवश्यक आहे. कारण आज मानसिक रोगांचे (Psychological disorders) वाढते प्रमाण, त्यातल्यात्यात तरुणांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येत आहे. त्यामध्ये चिंतारोग, औदासिन्य, निराशा, भिती (Phobia), ओ.सि.डी.(Obscessive Compulsive Disorder) याप्रकारचे मानसिक आजार दिसून येतात.अशा सर्व रोगामध्ये ध्यानाचा चिकीत्सा किंचा उपचार पद्धती म्हणून त्याचा उपयोग करून घेता येतो. वरील सर्व मानसिक आजारांचा त्रास कमी करून आपला विकास करून घ्यायचा असेल तर त्यासाठी "ध्यान" हा आवश्यक पर्याय आहे.
ध्यानाचा शब्दशः अर्थ हा लक्ष किंवा (attention) हा आहे. आपण एखादी गोष्ट शिकवताना सांगतो की, ध्यान (लक्ष) देऊन ऐका. म्हणजेच ते ध्यान आहे. हे ध्यान चार वेगवेगळ्या प्रकारे करता येते. ह्या चार प्रकारचे ध्यानाचे मेंदूवर होणारे परिणामही वेगवेगळे आहेत. यात पहिला प्रकार आहे एकाग्रता ध्यान (Focused Meditation) क्रमशः
Sharadyogvigyan.blogspot.com

Kup chan mahiti milat ahe
ReplyDelete