Sunday 17th May 2020
🧘🏻♂योग विज्ञान शृंखला🧘♀
✒️.....डॉ. शरद रामढवे.
(कान,नाक,घसा तज्ञ)
प्राणायाम भाग ९
प्राणायामातील बंधामुळे शरीरातील काही ठराविक भागावर दाब निर्माण होतो, विशेषकरुन अन्तःस्त्रावी ग्रन्थि (Endocrine glands) त्यामुळे त्या सक्रीय होवून आधिक
चांगले कार्य करतात. बंधामुळे परिणाम होणाऱ्या भागाचा मज्जातंतुच्या जोड़णी मध्ये वाढ होते व तो भाग किंवा अवयव अधिकच क्षमतेने काम करू लागतो.
कांही प्राणायामांचा स्वायत्त मज्जासंस्था (Autonomic nervous system) जसे अनुकंपा मज्जासंस्था (Sympathetic nervous system) व परानुकम्पा मज्जासंस्था(Parasympathetic nervous system) यावर उत्तेजनात्मक व कांहींचा प्रतिबंधात्मक परिणाम दिसून येतात.
आपल्या मेंदूमध्ये कोट्यवधी मज्जापेशी अनियमितपणे कार्यान्वित असतात.अश्या मेंदूचा आलेख (E. E. G) घेतल्यास मेंदू लहरी मध्ये अनियमित पैटर्न दिसून येतो.गोंधळलेल्या मनाची स्थिति म्हणजेच मज्जापेशींचा अनियमित पैटर्न म्हणावयास हरकत नाही.जेंव्हा मज्जापेशी तालबद्धतेने काम करीत असतात, त्यावेळी मनही नियंत्रित असते,ज्यामुळे विचार,कृती, निर्णय क्षमता,भावनावरिल नियंत्रण, जागरूकता यावर चांगला प्रभाव पडतो.
सन १९६८ मध्ये भारतीय स्वास्थ मंत्रालयाच्या सांगण्यावरुन बिहार स्कूल ऑफ योगा मध्ये हॄदयांच्या रोग्याच्या हजारो पेशंटवर एक संशोधन अभ्यास झाला.त्यामधे विशेषतः अंनजायना ,मायोकार्डियल इन्फारक्शन ,कोरोनरी हार्ट डसीज,इस्कीमिया (ischemia) वग़ैरेचे हॄदयाशी सम्बंधित रोगी होते.सर्वांकडून योग आणि प्राणायामाचा अभ्यास करून घेतल्यानंतर सर्वांनाच त्याचा फायदा झाला. प्राणायामामुळे कमी झालेला मानसिक तणाव आणि खोल, हळूवार व दीर्घ श्वसनांमुळे हृदयास मिळालेल्या विश्रांतीचा हा परिणाम असावा असे सिद्ध झाले.
योगा रिसर्च फाउंडेशन मुंगेर येथे २००७ मध्ये ३० रक्तचाप असणाऱ्या युवकावर संशोधन झाले.त्यामध्ये सर्व युवकांकडून नाडीशोधन प्राणायाम (१:१) या प्रमाणात एक महिना नियमित अभ्यास करून घेतला. अभ्यासाअंती सर्वांचे सिस्टोलीक व डायास्टोलिक ब्लडप्रेशर सामान्य झाल्याचे निदर्शनास आले .
सन २००६ मध्ये योगा रिसर्च फाउंडेशन भोपाळ येथे २२ अस्थमा पेशंट ,११ उच्चरक्तचाप व ७ निरोगी युवकावर उज्जयी प्राणायामामुळे होणाऱ्या परिणामाचा अभ्यास झाला.त्यामध्ये सर्वाकडून दररोज ५ मिनिटे असे एक महिना उज्जयी प्राणायामाचा अभ्यास केल्यानंतर असे निदर्शनास आले की, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण ०.७५ % वरून ५ % जे की सर्वाधिक होते. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण सरासरी २ % पर्यंत पोहोंचले होते जी एक लक्षणीय वाढ आहे.
भस्त्रिका आणि कपालभाती प्राणायाम हे चैतन्य (Vitalizing) निर्माण करणारे प्राणायाम असून यामुळे श्वसनासाठी कामी येणाऱ्या स्नायूंचा चांगला व्यायाम होतो.तसेच स्वायत्त मज्जासंस्थेस (Central Autonomic Nervous System) जास्त प्रेरणा मिळते.त्यामुळे मेंदू सक्रिय बनतो.यास यौगिक परिभाषेत सुषुम्ना जागृत होणे असे म्हणतात.वर्ष २००४ मध्ये योग रिसर्च फाउंडेशन ने हे प्रयोगाअंती सिद्ध ही केले आहे.
भस्त्रिका प्राणायाम हा जलद केला जातो आणि जी माणसे अति सक्रिय आहेत आणि मनाने चंचल आहेत अशा लोकांनी भस्त्रिका प्राणायाम करणे जास्त महत्वाचे व फायदेशीर ठरू शकते.
sharadyogvigyan.blogspot.com

खूप अभ्यासपूर्ण लिखाण.
ReplyDeleteThanks for your encouraging comment
DeleteVery good article on Pranayam
ReplyDeleteKup mast
ReplyDelete